Tuesday, September 26, 2023

कम्युनिटी रेडिओचे जाळे विस्तारणार

नवी दिल्ली : देशातील दुर्गम भागात कोव्हिड-१९ विषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी देशभरातील कम्युनिटी रेडिओ केंद्रांना सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले आहे.

Read More  हिंगोलीत एकाच दिवशी 50 कोरोनाबाधित वाढले

सामुदायिक रेडिओ म्हणजे परिवर्तनाचे पाईक आहेत, असे जावडेकर म्हणाले. या केंद्रांपर्यंत संपर्क अभियानांतर्गत पोहोचण्याच्या एक विशेष भाग म्हणून जवळपास तीनशे सामुदायिक रेडिओ केंद्रांना संबोधित करताना ते बोलत होते. सरकार लवकरच अशा स्थानकांची संख्या वाढविण्याची योजना घेऊन येईल, असे त्यांनी सांगितले. कम्युनिटी रेडिओ केंद्रे स्वयं-शाश्वत व्हावीत म्हणून त्यांचा जाहिरात प्रसारण कालावधी वाढविण्यासाठी सरकार उत्सुक आहे.

सध्या कम्युनिटी रेडिओवरील जाहिरात प्रसारण कालावधी ताशी सात मिनिटे आहे, तर दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी तो १२ मिनिटे आहे. सर्व रेडिओ केंद्रांना समान वेळ देण्यास आपण उत्सुक आहोत, जेणेकरून त्यांना निधी मिळविण्याची गरज भासू नये, असेही जावडेकर म्हणाले.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या