मुंबई, दि.२६ : मुंबई आणि पुणे ही दोन शहरे येत्या शनिवार पासून १० दिवसांसाठी पूर्णत: लष्कराच्या लॉकडाऊनमध्ये असणार अशी सावध करणारी एक बातमी सध्या व्हॉटसएप ग्रुप्समध्ये फिरते आहे. यात महाराष्ट्र सरकारची एक बैठक सध्या सुरु असून कोणत्याही क्षणी पूर्णपणे बंदचा निर्णय घेतला जाईल असे या पोस्टमध्ये म्हणले आहे. सदरहू पोस्ट पूर्णपणे खोडसाळ असून अफवा पसरविण्याच्या उद्देशाने ती टाकली आहे असे शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबई, पुणे पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याचा सोशल मीडियावरून व्हायरल झालेला मेसेज/बातमी खोडसाळ; नागरिकांनी अशा खोट्या #Fake मेसेजवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन. खोटे संदेश फॉरवर्ड करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा @MahaCyber1 चा इशाराhttps://t.co/nDGrRqvVyi pic.twitter.com/1KKY50NsC7
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 26, 2020