22 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeमहाराष्ट्रकोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ५० हजाराखाली, मृत्यदरही घटला !

कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ५० हजाराखाली, मृत्यदरही घटला !

एकमत ऑनलाईन

मुंबई, दि.४ (प्रतिनिधी) कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे जगभरात चिंतेचे वातावरण असले तरी राज्यातील कोरोनाची स्थिती झपाट्याने सुधारत असल्याने दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासात १० हजार ३६२ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, २७६५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात २९ मृत्यूची नोंद झाली असली तरी यातील केवळ ११ मृत्यू गेल्या २४ तासातील आहेत.

जुलै महिन्यात राज्यात रोज जवळपास २० हजाराहून अधिक नवीन रुग्णांची नोंद होत होती. सक्रिय रुग्णांची संख्याही तीन लाखांच्या जवळपास पोचली होती. परंतु ही स्थिती नियंत्रणात आले असून, सक्रिय रुग्णांचा आकडा ४८ हजार ८०१ पर्यंत खाली आला आहे. यातील ३० हजार रुग्ण मुंबई, ठाणे व पुण्यातले आहेत. गेल्या २४ तासात राज्यात २७६५ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर १० हजार ३६२ लोक बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण १८ लाख ४७ हजार ३६१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.८८ % एवढे झाले आहे.

आज राज्यात २९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. नोंद झालेल्या या २९ मृत्यूंपैकी ११ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील आठ महापालिका क्षेत्रात व १३ जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५५% एवढा आहे. सध्या राज्यात २,४१,७२८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये, तर ३,०७८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

टीम इंडियासाठी गुड न्यूज

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या