नवी दिल्ली : देशभरात कोरोना बाधितांची संख्या आता 1.45 लाखाच्याही पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सकाळी दिलेल्या माहितीनुसार, आता देशातील एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 45 हजार 380 झाली आहे. यापैकी 4 हजार 167 जणांचा मृत्यू झाला. तर 60 हजार हून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 6 हजार 535 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 146 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 80 हजारहून अधिक आहे.
महाराष्ट्
महाराष्ट्रात सोमवारी रात्रीपर्यंत 2436 नव्या कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली, यामुळे आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 52667 वर पोहोचला आहे. यापैकी 1695 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15,786 रुग्णांना बरे झाल्यानंतर दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 35178 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
Read More लॉकडाउन वाढवणं आर्थिक दृष्टीने अनर्थकारी ठरेल- आनंद महिंद्रा
दिल्ली
दिल्लीतील एकूण रुग्णांची संख्या 14 हजारवर पोहोंचली आहे. येथे आतापर्यंत 276 जणांचा कोरोनामुळे मृत्यी झाला आहे.
तामिळनाडू
तामिळनाडूतील कोरोनाबाधितांच्या आकड्याने 17 हजारचा टप्पा ओलांडला आहे. तर 118 लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, दिल्ली आणि तमिळनाडूनंतर आता गुजरातमध्येही कोरोनारुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.