लातुर १, उदगीर १, एकूण २ पॉझिटीव्ह तर ११ रुग्णास डिस्चार्ज
लातूर : आज ०६.०६.२०२० रोजी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत लातुर जिल्हयातील एकुण 34 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील १५ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच्या सर्व 15 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एका व्यक्तींचा स्वॅब तपासणीसाठी आला होता त्या व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर देवणी येथुन एका व्यक्तींचा स्वॅब तपासणीसाठी आला होता त्या व्यक्तींचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. स्त्री रुग्णालय, लातुर येथून १७ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी १५ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून एका व्यक्तीचा अहवाल Inconclusive आला आहे.
Read More आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
असे लातुर जिल्हयातील एकुण ३४ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी ३१ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन ०२ व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत व एका रुग्णाचा अहवाल Inconclusive आला आहे अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.