24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeदेशातील कोरोना रुग्णांची संख्या सव्वा लाखाहून अधिक

देशातील कोरोना रुग्णांची संख्या सव्वा लाखाहून अधिक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: वृत्तसंस्था
गेल्या २४ तासांमध्ये भारतात एकूण ६,६५४ नवे कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, गेल्या २४ तासांत एकूण १३७ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशभरात कोरोना रुग्णांची संख्या १ लाख २५ हजार १०१ पर्यंत पोहोचली आहे. यापैकी ६९,५९७ सक्रिय रुग्ण आहेत. याबरोबरच आतापर्यंत करोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांची संख्या ३,७२० इतकी झाली आहे. दरम्यान, एकूण रुग्णांपैकी ५१,७८४ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

त्याचबरोबर, दिल्लीमध्ये गेल्या २४ तासांमध्ये १४ नवीन हॉटस्पॉट्स तयार करण्यात आले आहेत. हे आतापर्यंतच्या दिवसभरातील सर्वात जास्त हॉटस्पॉट आहेत. यासह दिल्लीतील कंटेन्मेंट झोनची एकूण संख्या ९२ वर पोहोचली आहे.दरम्यान, दिल्लीचा एक भाग देखील कंटेनमेंट झोनच्या यादीतून वगळण्यातही आला आहे.

Read More  लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी केला लडाख दौरा

यापूर्वी गुरुवारी कोरोनामुळे १४८ लोकांचा मृत्यू झाला होता. गुरुवारी सकाळी ६ वाजल्यापासून कोरोनामुळे १४८ लोकांचा मृत्यू झाला. तर ६,०८८ नवे रुग्ण आढळले, असे आरोग्य मंत्रालयाने माहिती देताना सांगितले.

देशात एकूण ६६,३३० रूग्ण कोरोनाने बरे झाले आहेत. तसेच एक रुग्ण परदेशात रवाना झाला आहे. आतापर्यंत देशातील ४०.९७ टक्के रुग्ण बरे झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिली. कोरोनाची लागण झालेल्या लोकांमध्ये परदेशी नागरिकांचाही समावेश आहे.

गुरुवारी सकाळपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या १८८ लोकांपैकी महाराष्ट्रातील ६४ रुग्ण, गुजरातमधील २४, दिल्लीतील १८, उत्तर प्रदेशातील ११, तामिळनाडूमधील ७, पश्चिम बंगालमधील ६, तेलंगणातील ५, राजस्थानमधील ४, मध्य प्रदेशातील ३, जम्मू-काश्मीरमधील २, बिहार, ओडिशा, हरियाणा आणि पंजाबमधील प्रत्येकी १ रुग्णांचा समावेश आहे.

Read More  सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करून जनतेने प्रवास करावा

विविध राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या
केरळमध्ये ७३२ रुग्ण त्यातील ५१२ बरे झाले. ४ मृत, रिकव्हरी रेट ६९़ ९४ टक्के. गेल्या दहाबारा दिवसात केरळमध्ये रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे़ त्यामुळे रिकव्हरी रेट ९४ टक्क्यांवरुन ७० टक्क्यांवर आला आहे.

जगभरात कोरोनाचा कहर सुरुच
जगभरातील २१३ देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे ५३ लाखांहून अधिक रुग्ण झाले आहेत. मागील २४ तासात जगातील २१३ देशांमध्ये १०७,७०६ नवीन कोरोना केसेस समोर आल्या आहेत़ तर कोरोनामुळे ५,२४५ बळी गेले आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण ५,३०३,७१५ लोकांना झाली असून, आतापर्यंत मृत्यूंची संख्या ३ लाख ३९ हजार ४१८ वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात २१ लाख ५६ हजार २८८ रुग्ण बरे झाले आहेत. जगातील ७५ टक्के कोरोनाबाधित हे केवळ बारा देशांमध्येच आहेत. या बारा देशांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा ४० लाखांच्या घरात आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या