25.1 C
Latur
Tuesday, March 2, 2021
Home महाराष्ट्र राज्यातील कोरोनाबधितांची संख्या १० लाखांपुढे, २४ तासात २४ हजार ८८६ नवे...

राज्यातील कोरोनाबधितांची संख्या १० लाखांपुढे, २४ तासात २४ हजार ८८६ नवे रुग्ण !

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.११ (प्रतिनिधी) राज्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसोंदिवस वाढतच चालला असून गेल्या २४ तासात राज्यात तब्बल २४ हजार ८८६ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे कोरोनाबधितांची एकूण संख्या १० लाख १५ हजार ७८१ झाली आहे. मुंबईतही कोरोनाने पुन्हा उचल खाल्ली असून १७ हजारांपर्यंत खाली आलेली सक्रिय रुगांची संख्या २७ हजारांपुढे गेली आहे.

कोरोनाच्या रुग्णसंख्येने आज दहा लाखांचा टप्पा ओलांडला. राज्यात आजपर्यंत ५० लाख ७२ हजार ५२१ चाचण्या करण्यात आल्या असून त्यातील १० लाख १५ हजार ६८१ जणांना कोरोनाची (२० टक्के) बाधा झाल्याचे आढळून आले आहे. यातील ७ लाख १५ हजार २३ रुग्ण बरे झाले असून तब्बल २ लाख ७१ हजार ५६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आज दिवसभरात ३९३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे मृतांची एकूण संख्या २८ हजार ७२४ झालीय. राज्यात सध्या १६ लाख ४७ हजार ७४२ लोक होम क्वारंटाईन असून, ३८ हजार ४८७ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मराठा आरक्षणाबाबत तसूभरही मागे हटणार नाही ! -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या