Tuesday, September 26, 2023

देशातील कोरोना बाधितांचा आकडा दीड लाख पार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अशातच देशात गेल्या २४ तासांत संसर्ग झालेले ६३८७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. नव्या रुग्णांचा आकडा सलग दुसºया दिवशी कमी झाल्याचे पाहायला मिळाले. मागील २४ तासांत १७० लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशात एक लाख ५१ हजार ७६७ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच, ४३८७ लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ६४ हजार ४२५ लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

देशातील कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. परंतु, केंद्र सरकार आणि आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात परिस्थिती उत्तम आहे. मंगळवारी आरोग्य मंत्रालयाच्यावतीने जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, भारतात रिकव्हरी रेट म्हणजेच, कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढत आहे. तर मृत्यूदरही सतत कमी होत असल्याचे दिसत आहे. जगभरातील इतर देशांशी तुलना केल्यानंतर भारतातील परिस्थिती ठिक आहे.

महाराष्ट्रात काल २ हजार ९१ कोरोना बाधितांची वाढ झाली आहे. तर ११६८ रुग्ण बरे झाले. तर दिवसभरात सर्वाधिक ९७ लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा ५४ हजार ७५८ वर पोहोचला आहे. त्यातील १६ हजार ९५४ रुग्ण बरे झाले. सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण ३६ हजार ४ रुग्ण आहेत. तर मृतांचा आकडा १७९२ वर पोहोचला आहे. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट आहे ३०़९६ टक्के एवढा आहे. तर एकट्या मुंबई शहरात ३२ हजार ९७४ कोरोनाबाधित असून त्यातील १०६५ जणांचा मृत्यू झाला आहे.

केरळमध्ये ९३६ रुग्ण असून त्यातील ५४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमधील रिकव्हरी रेट ५६़२८ टक्के एवढा आहे. गेल्या दहा ते पंधरा दिवसांत केरळमध्ये रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे. त्यामुळे रिकव्हरी रेट ९४ टक्क्यांवरुन ५६ टक्क्यांवर आला आहे.

Read More मास्क लावायला सांगितल्याने संतापलेल्या महिलेचा पोलिसांना चावा

भारतात रिकव्हरी रेट ४१़६०

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशाचा रिकव्हरी रेट ४१़६० एवढा आहे. मार्चमध्ये रिकव्हरी रेट ७़१ एवढा होता. देशाचा रिकव्हरी रेट हळूहळू सुधारला आहे. तसेच देशाचा मृत्यूदर २़८७ एवढा आहे. फ्रान्समध्ये १९़९ टक्के एवढा मृत्यू दर होता. भारतात प्रति लाख मृतांचा आकडा ०़३ % इतका आहे. तर भारतात प्रतिलाख कमी मृत्यूदर आणि कोरोना बाधितांची संख्या कमी ठेवण्यासाठी लॉकडाऊनची सर्वात मोठी भूमिका आहे. सोशल डिस्टन्सिगचा एखाद्या सोशल वॅक्सिनप्रमाणे वापर करा. आयसीएमआर महानिर्देशक बलराम भार्गव यांनी सांगितले की, ६१२ बॉब्समध्ये सध्या चाचण्या केल्या जात आहेत. मागील तीन महिन्यांमध्ये तपासण्या अनेक पटींनी वाढवण्यात आल्या आहेत.

हाइड्रोक्सीक्लोरोक्वीनचा वापर केल्यामुळे सध्या कोणतेच नुकसान नाही : आयसीएमआर
आईसीएमआरने हाइड्रोक्सीक्लोरोक्वीनसंदर्भात बोलताना सांगितले की, कोविड नवा आजार आहे. अद्याप यावर उपचार करण्यासाठी काय करावे हे कोणालाच माहिती नाही. बायोलॉजिकल पलॉजीबिलिटीची कारणे आणि आम्हीही विट्रो टेस्ट केल्या होत्या. असे मानले जाते की, याचे अ‍ॅन्टी व्हायरल गुण आहेत. एम्स आणि दिल्लीतील तीन खासगी रुग्णालांमध्ये यासंदर्भात एक कंट्रोल संशोधन करण्यात आले होते़ त्यामधून हे औषध फायदेशीर ठरू शकते आणि याचे कोणतेही दुष्परिणाम नसल्याचे समोर आले होते़ त्याचबरोबर या औषधाचा वापर करताना ईसीजी करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या