नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळात लागू केलेले निर्बंध केंद्र सरकारने शिथिल केल्यानंतरच्या कोरोना रुग्णांची संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी ४० हजार असलेली रुग्णांची संख्या आता ९० हजारांच्या वर जाऊन पोहोचली आहे. कोरोनामुळे देशातील परिस्थितीही चिंताजनक होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे.
Read More वादळी पावसामुळे घरे, दुकानांचे नुकसान
स्थलांतरामुळे विशेषत: शहरातील कोरोना हा गाव-खेड्यांमध्ये पोहचल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. देशातील मोठ्या शहराची परिस्थिती ही चिंताजनक असून एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येपैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण या ठिकाणी आहेत.
मुख्यतः मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई आणि पुणे या पाच शहरातील स्थिती ही गंभीर आहे. या पाच शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या जवळपास ४६ हजार आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत जवळपास २,८०० लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी भारतात लागू करण्यात आलेल्या लॉकाडाऊनला पन्नास दिवस पूर्ण झाले आहेत.