36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeराष्ट्रीयरुग्णसंख्या ६४ लाखांवर

रुग्णसंख्या ६४ लाखांवर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताने शनिवारी कोरोनाबाधितांच्या मृत्यूंचा एक लाखांचा टप्पा ओलांडला. तसेच एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६४ लाखांवर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात ७९,४७६ नवे रुग्ण आढळून आले असून १,०६९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६४ लाख ७३ हजार ५४४ वर पोहोचली आहे, तर १ लाख ८४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याच दिवशी महिन्याभरापूर्वी भारतात एकूण ६७ हजार ३७६ रुग्णांचा मृत्यू झाला होता.

देशातील एकूण कोरोनाबाधितांपैकी सध्या ९ लाख ४४ हजार ९९६ रुग्ण सध्या अ‍ॅक्टिव्ह आहेत, तर ५४ लाख २७ हजार ७०६ रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे भारताचे प्रमाण ८३.८४ टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण हे दिवसेंदिवस कमी होत असून ते सध्या १.५६ टक्के आहे.

जगाच्या तुलनेत १० टक्के बाधितांचा मृत्यू भारतात
भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या एक लाखांवर पोहोचली. जगभरात आतापर्यंत कोरोनामुळे १० लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. याचा अर्थ जगभरातील एकूण मृत्यूंपैकी १० टक्के मृत्यू भारतात झाले आहेत. भारताच्या तुलनेत फक्त अमेरिका आणि ब्राझिलमध्ये सर्वात जास्त मृत्यूंची नोंद झाली आहे. अमेरिकेत २ लाख १२ हजार तर ब्राझिलमध्ये १ लाख ४५ हजार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

१४ गावच्या कृषीपंपाना आता केवळ दिवसाच वीजपुरवठा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या