मुंबई : शिवसेनेचे मंत्री आणि गटनेते असलेल्या एकनाथ शिंदे यांनीच बंडखोरी केल्यामुळे राज्यातील राजकारणासह देशातील राजकारणातही चर्चेला उधाण आले.
एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेच्या ३३ आणि बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे २ आमदार असल्यामुळे आता ३५ आमदार आपल्यासोबत असल्याचा शिंदेंनी खुलासा केला. दरम्यान, काँग्रेसचे आमदारही सोबत येणार असल्याचा खुलासा बच्चू कडू यांनी केला आहे.
बच्चू कडू सध्या एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटी येथे आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सध्या आमच्यासोबत शिवसेनेचे ३३ आमदार आहेत आणि काही अपक्ष आहेत. आज आणखी काही आमदार दाखल होणार आहेत. त्यामुळे शिवसेनेचा आकडा ३८-३९ पर्यंत जाईल. एकूण आमदारांची संख्या ५० पर्यंत नक्कीच जाईल. काँग्रेसचेही काही आमदार सोबत येणार आहेत. दोन-तीन दिवसांत चित्र स्पष्ट होईल, असा दावा बच्चू कडू यांनी यावेळी केला.