23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्र..ती वस्तू ‘बॉम्ब’ नव्हे; पुणे पोलिस आयुक्तांची माहिती

..ती वस्तू ‘बॉम्ब’ नव्हे; पुणे पोलिस आयुक्तांची माहिती

एकमत ऑनलाईन

पुणे : पुणे रेल्वे स्थानकात शुक्रवारी सकाळी बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्याने मोठी खळबळ उडाली. स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी परिसरात वस्तू सापडल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पोहोचले. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांनी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. पुणे रेल्वे स्थानक रिकामे करण्यात आले होते तसेच पुण्याकडे येणा-या सर्व रेल्वे गाड्या थांबण्यात आल्या होत्या.

त्यानंतर पुणे रेल्वे स्थानकाची कसून तपासणी करण्यात आली. पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्या देखरेखीखाली शोध मोहीम सुरू होती. बॉम्बशोधक आणि बॉम्बनाशक पथक याठिकाणी हजर आहे. यावेळी अमिताभ गुप्ता यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सकाळी साडेदहा वाजता रेल्वे स्थानकावर स्फोटकसदृश्य वस्तू आढळून आल्या. प्रथमदर्शनी तरी या वस्तू जिलेटीन असल्याचे वाटत नाही. पण बॉम्बशोधक पथकाकडून या वस्तूंची तपासणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले होते.

तब्बल तासाभराच्या तपासणीनंतर रेल्वे स्थानकावर सापडलेल्या या वस्तू बॉम्ब नसल्याचे स्पष्ट झाले. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, पुणे रेल्वे स्थानकावर कोणताही बॉम्ब किंवा स्फोटके आढळलेली नाहीत. फलाट क्रमांक १ आणि २ पुन्हा एकदा रहदारीसाठी खुले करण्यात आले असून रेल्वे वाहतूकही पूर्ववत सुरू झाली आहे. ज्या वस्तू मिळाल्या आहेत, त्यांची तपासणी सुरू आहे. यामध्ये कोणतेही सर्किट किंवा स्फोटक घटक आढळून आलेले नाहीत. रेल्वे पोलिस आणि पुणे पोलिसांकडून याचा समांतररीत्या तपास केला जाईल, अशी माहिती अमिताभ गुप्ता यांनी दिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या