Wednesday, September 27, 2023

ऑलिंपिक स्पर्धा रद्द करण्यात येईल़़

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष बॅच यांचे स्पष्ट संकेत

नवी दिल्ली : २४ जुलै २०२० पासून रंगणारी प्रतिष्ठेची टोक्यो ऑलिंपिक क्रीडा स्पर्धादेखील २०२० ऐवजी २०२१ या वर्षात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीकडून देण्यात आली होती. त्यानंतर, टोक्यो ऑलिंपिक स्पर्धा जर २०२१ मध्ये आयोजित करणे शक्य झाले नाही, तर ती स्पर्धा रद्द करण्यात येईल, असे विधान समितीचे अध्यक्ष थॉमस बॅच यांनी केले.

Read More  तब्बल 18 फुटांपर्यंत जाऊ शकतो सोशल डिस्टन्सिंग

जोपर्यंत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे, तोपर्यंत २०२१ मध्ये देखील ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन करणे शक्य नाही, अशी समस्या जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी आॉलिम्पिक समितीपुढे मांडली. ही समस्या समजून घेत बॅच यांनी वरील विधान केले. ‘‘जपानची समस्या आपण समजून घ्यायला हवी. कारण कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे संपेपर्यंत जपान काहीही करू शकत नाही. त्यात महत्त्वाचे म्हणजे आॅलिम्पिक आयोजनासाठी कामावर रुजू करून घेतलेल्या सुमारे तीन ते पाच हजार अतिरिक्त कर्मचा-यांना किती काळ अशाच प्रकारे मानधन किंवा वेतन देणे शक्य होणार आहे. जगभरातील सर्व देशांचे वार्षिक वेळापत्रक दरवर्षी बदलणे ही सोपी बाब नाही. जेव्हा २०२१ मध्ये जगाबाबत नीट कल्पना येईल, तेव्हाच त्यावर निर्णय घेतला जाईल अन्यथा ऑलिंपिक स्पर्धा रद्द करावी लागेल’’, असे बॅच म्हणाले.

जर २०२१ मध्ये ऑलिंपिक स्पर्धा झाल्या नाहीत, तर ती स्पर्धा रद्द
यंदाच्या ऑलिंपिक स्पर्धेचे यजमानपद जपानकडे आहे. २४ जुलै ते ९ आॅगस्ट या दरम्यान ही ऑलिंपिक स्पर्धा नियोजित होती. पण कोरोनाच्या संकटामुळे स्पर्धेचे आयोजन पुढे ढकलावे अशी मागणी विविध स्तरांतून केली गेली. स्पर्धा नियोजित वेळीच होणार असा पवित्रा जपानचे सरकार आणि ऑलिंपिक समिती यांच्याकडून घेण्यात आला होता. पण आधी कॅनडा, नंतर आॅस्ट्रेलिया आणि पाठोपाठ एका-एका देशाने आपले खेळाडू या स्पर्धेसाठी पाठवण्यास नकार दिला. त्यामुळे अखेर जपानने आॅलिम्पिकचे आयोजन लांबणीवर टाकले.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या