24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रकांदा गडगडला; नाफेडविरोधात शेतक-यांचे आंदोलन

कांदा गडगडला; नाफेडविरोधात शेतक-यांचे आंदोलन

एकमत ऑनलाईन

नाशिक : मागील काही महिन्यांपासून देशासह राज्यात कांद्याला बाजार समितीत व नाफेडकडूनही उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत आहेत. परिणामी, शेतक-यांचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. कांद्याचे दर प्रचंड घसरल्याने राज्यात काही ठिकाणी शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. कांदा दर घसरणीमुळे शेतक-यांमध्ये प्रचंड संतापाची भावना असताना देशासह राज्यातील राजकीय नेत्यांचे मात्र सोयीस्कररित्या कांदा प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय नेत्यांचे कांदाप्रश्नी लक्ष वेधून घेण्यासाठी हे अनोखे आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी रविवार दि. २२ मे रोजी येथे दिली.

शेतक-यांच्या अर्थचक्राचा प्रमुख भाग बनलेल्या कांदा उत्पादकांना सरकारी निर्णयामुळे दरवर्षी मोठा फटका बसतो. कांद्याबद्दलची अत्यंत विस्कळीत धोरणे आणि उत्पादकांची म्हणावी तशी एकजूट नसल्याने कांदा उत्पादक गत काही वर्षांपासून सातत्याने उपेक्षित राहिला आहे. याबाबत उत्पादकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी आता राज्य कांदा उत्पादक संघटनेने आता कमेंट्स आंदोलन हाती घेतले आहे.

कसे असणार आंदोलन?
सोशल मीडियाचा वापर करणा-या सर्वच कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी राजकीय नेत्यांच्या सोशल मीडियावरील व्हीडीओज आणि मेसेजेसच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये जाऊन शेतक-यांच्या कांद्याला तात्काळ ३० रुपये प्रति किलोचा भाव द्यावा अशी मागणी करावी. ही मागणी करताना मराठी, हिंदी, इंग्रजी अशा भाषेत कमेंट्स कराव्यात असे आवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

किमान ३० रुपये किलो दराची मागणी
आमदार, खासदार, मंत्री, केंद्रीय मंत्री, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, पंतप्रधान या सर्वांच्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात येणा-या पोस्टमध्ये कांदा उत्पादक शेतक-यांनी कांद्याच्या घसरलेल्या बाजार भावात तात्काळ सुधारणा व्हावी. कांद्याला कमीत कमी ३० रुपये किलोचा दर मिळावा. कांद्याची जास्तीत जास्त निर्यात करावी यासाठी हजारो कमेंट्सच्या माध्यमातून आवाज उठवावा. आपण केलेल्या कमेंट्सचे स्क्रीनशॉट काढून आपापल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करावेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या