31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeआमच्या येथून झालेली नाही कोरोनाची उत्पत्ती - वुहान लॅब

आमच्या येथून झालेली नाही कोरोनाची उत्पत्ती – वुहान लॅब

एकमत ऑनलाईन

चीन : चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 3 लाखांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. व्हायरसच्या उत्पत्तीबाबत आतापर्यंत अनेक दावे करण्यात आले. चीनच्या वुहान शहरातील लॅबमध्ये हा व्हायरस निर्माण करण्यात आल्याचा देखील दावा करण्यात आला होता. जगभरातील वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की वुहान वायरोलॉजी इंस्टिट्यूटमध्येच अनेक व्हायरसवर संशोधन होत असते. मात्र आता स्वतः वुहान लॅबने या आरोपांना उत्तर दिले आहे.

Read More  गोड बातमी : चार भारतीय लस चाचणीच्या टप्प्यात

लॅबचे डायरेक्टर वांग हे एका मुलाखतीमध्ये म्हणाले की, वुहान लॅबमधील वटवाघळांमधून कोरोना व्हायरसचे तीन लाईव्ह स्ट्रेन घेण्यात आले होते. मात्र यातील कशातही कोव्हिड-19 चा व्हायरस आढळला नाही. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि इतरांनी लॅबमधून व्हायरस लीक झाल्याचा केलेला दावा चुकीचा आहे. लॅबने या दाव्यानंतर वटवाघळांमधून कोरोना व्हायरसचे काही नमुने घेतले व त्याचा तपास केला. ते म्हणाले की, आमच्याकडे व्हायरसचे तीन जिंवत नमूने आहेत. मात्र ते कोव्हिड-19 च्या व्हायरसशी केवळ 79.8 टक्के मिळते-जुळते आहेत.

वांग म्हणाले की, आम्हाला माहिती आहे की सार्स-कोव्ह2 चे जिनोम आधीच्या सार्स व्हायरसशी केवळ 80 टक्के साम्य आहे. लॅबने स्पष्ट केले की, त्यांना नवीन व्हायरसचे नमुने 30 डिसेंबरला मिळाले व याचा जिनोम 2 जानेवारीला कन्फर्म झाला. यानंतर लॅबने 11 जानेवारीला या व्हायरसच्या पॅथोजनची माहिती जागतिक आरोग्य संघटनेला दिली होती. डिसेंबरमध्ये व्हायरसचे नमुने मिळण्याआधी लबॅमध्ये कधीही व्हायरस ठेवण्यात आला नव्हता व यावर रिसर्च देखील केले नाही.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या