16.6 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeसोलापूरमराठा आरक्षणाच्या भडक्याला सोलापुरातून सुरुवात

मराठा आरक्षणाच्या भडक्याला सोलापुरातून सुरुवात

मराठा क्रांती मोर्चा आंदोलकांचा आत्मदहनाचा प्रयत्न

एकमत ऑनलाईन

सोलापूर : मराठा आरक्षणाच्या भडक्याला पुन्हा सोलापुरातून सुरुवात झाली आहे. मराठा क्रांती मोर्चा आंदोलकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. तर दुपारच्या सुमारास सोलापूर-पुणे महामार्गावर आंदोलकांनी रस्ता रोखून धरला. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याचा संताप शुक्रवारी सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी व्यक्त केला. अवंतीनगर, अरविंदधाम येथील पाण्याच्या टाकीवर चढून युवा कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच त्यांना अटकाव करून ताब्यात घेतले.

https://www.youtube.com/watch?v=Qy6aS_q4-fc

आज सकाळी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते राम जाधव, किरण पवार, ओम घाडगे, अजिंक्य पाटील आदी आरक्षण आमचे हक्काचे, नाही कोणाचे बापाचे, आरक्षण मिळालेच पाहिजे, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत येथे जमले. पाठोपाठ प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी आणि पोलिसही येथे पोहोचले. टाकीवर चढून आत्मदहन करण्याच्या विचारात असलेल्या या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

भारत-चीन तणाव कमी करण्यासाठी पंचसूत्री फॉर्म्युला ठरला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या