23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रसत्तासंघर्षाचा निकाल पाच वर्षे तरी लागणार नाही

सत्तासंघर्षाचा निकाल पाच वर्षे तरी लागणार नाही

एकमत ऑनलाईन

 भरत गोगावलेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

मुंबई : राज्यातला सुप्रीम कोर्टातला सत्तासंघर्ष दीर्घकाळ चालेल असे संकेत शिंदे गटाकडून देण्यात येत आहे. या सत्तासंघर्षाचा निकाल किमान ५ वर्षे लागण्याची शक्यता नाही असे खळबळजनक विधान शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने चर्चांना उधाण आहे. कर्जत येथे रविवारी शिंदे गटाने कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर शिंदे गटाकडून आता कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले जात आहेत. भरत गोगावले हे रायगडमधील महाड येथील आमदार आहेत. या मेळाव्यात भरत गोगावले यांनी म्हटले की, महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष आता घटनापीठाकडे गेला आहे. सुप्रीम कोर्टात हे प्रकरण पाच वर्ष चालणार आहे. येत्या निवडणुकीत आम्हीच निवडून येणार असल्याचे गोगावले यांनी म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मिशन आम्ही रोखले आहे. भाजप आणि शिवसेनेचे मिशन २०० पूर्ण करायचे आहे. आम्ही एकनाथ शिंदे यांचे समर्थक असून चमत्कार घडवणार असल्याचे गोगावले यांनी म्हटले.

आम्ही गद्दार नाही, धनुष्यबाण आमचाच
आम्ही गद्दार होऊ शकत नाही असेही भरत गोगावले यांनी म्हटले. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्याचे काम करत आहोत, असेही त्यांनी म्हटले. शिवसेनेची निशाणी धनुष्यबाण आमच्याकडे राहणार असून आम्हीच पुन्हा आमदार होणार असल्याचे सांगत त्यांनी शिवसेनेला आव्हान दिले आहे.

आमचा नाद करायचा नाही असं म्हणत गोगावले यांनी विरोधकांना इशारा दिला. यावेळी गोगावले यांनी शिवसेनेचे नेते माजी खासदार अनंत गीते, सुभाष देसाई यांच्यावरही टीका केली. अनंत गीते यांनी आपला स्वार्थ साधला असल्याचा आरोप गोगावले यांनी केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या