22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeक्रीडापाकचा खेळाडू मॅच फिक्सिंगमध्ये अडकला

पाकचा खेळाडू मॅच फिक्सिंगमध्ये अडकला

एकमत ऑनलाईन

लाहोर : मॅच फिक्सिंग प्रकरणामुळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. फिक्सिंगची माहिती न दिल्यामुळे नॅशनल टी-२० कप खेळणा-या झिशान मलिक याचे निलंबन करण्यात आले आहे, यामुळे आता झिशान कोणत्याही स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. झिशानने २०१६ साली अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. ५६ च्या सरासरीने त्याने २२५ रन केले होते. झिशान मलिकने नॅशनल टी-२० कपमध्ये नॉर्थन टीमकडून खेळताना २५ च्या सरासरीने १२३ रन केले, पण त्याच्या टीमला फायनलमध्ये प्रवेश मिळाला नाही. २४ वर्षांच्या झिशान मलिकने फिक्सिंगबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला माहिती दिली नसल्याचा आरोप लावण्यात आला आहे. पीसीबीने गुरुवारी झिशानला भ्रष्टाचारविरोधी नियमानुसार निलंबित केले

२०१६ साली झिशानने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. २०१९-२० साली त्याने ५२ च्या सरासरीने ७८० रन केले होते. उमर अकमलवरही अशीच कारवाई याआधी याच नियमानुसार पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू उमर अकमल याच्यावरही अशाच प्रकारे कारवाई करण्यात आली होती. एप्रिल २०२० साली त्याच्यावर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली, पण अपीलनंतर त्याची शिक्षा १८ महिन्यांची करण्यात आली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या