24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रमंडळ चालवत आहेत की पक्ष?; मनसेने शिवसेनेला पुन्हा डिवचले

मंडळ चालवत आहेत की पक्ष?; मनसेने शिवसेनेला पुन्हा डिवचले

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेनेचे उपनेते आणि शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विषयावर पक्षाची चांगलीच फजिती झाली आहे. आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी झाल्याचे वृत्त शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’मध्ये छापून आले होते.

त्यानंतर काही तासांमध्येच पक्षाने यू टर्न घेत ही कारवाई मागे घेतली आहे. ‘सामना’तील बातमी अनवधानाने छापण्यात आली आहे. शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेना उपनेते म्हणून शिवसेनेतच कार्यरत आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे.

शिवसेनेतील या गोंधळावर मनसेने टोला लगावला आहे. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्विट करत शिवसेनेला डिवचले आहे. ‘संपलेल्या पक्षात आता कोणी उरतं की नाही या भीतीने आढळराव यांच्यावरची कारवाई मागे … मंडळ चालवत आहेत की पक्ष?’ असा टोला काळे यांनी शिवसेनेला लगावला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या