Sunday, September 24, 2023

सीबीएसई बारावीच्या परीक्षेत मुलीचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण जास्त

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड म्हणजेच CBSE सीबीएसईच्या बारावी परीक्षेचा CBSE 12th Result 2020 निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. सीबीएसई बारावीच्या परीक्षेत देशभरातून 88.78 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 15 फेब्रुवारी ते 30 दरम्यान सीबीएसईच्या परीक्षा देशभरात घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये तब्बल 30 लाख विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते. सीबीएसई परीक्षा सुरु असतानाच, कोरोना व्हायरसच्या साथीला प्रतिबंध घालण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता.

सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचं प्रमाण केरळच्या तिरुवनंतपुरम विभागात

2019 च्या तुलनेत यावर्षीचा निकाल 5.38 टक्के जास्त आहे. गेल्या वर्षी 83.40 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यावर्षी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी 88.78 टक्के आहेत. सीबीएसईच्या पुणे विभागात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी 90.24 टक्के आहे. देशात सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचं प्रमाण केरळच्या तिरुवनंतपुरम विभागात आहे, तिथे 97.67 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याखालोखाल बेंगळुरू विभागाचा नंबर आहे, बेंगळुरू विभागात 97.05 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

सर्वात कमी विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचं प्रमाण पाटणा विभागात

सर्वात कमी विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचं प्रमाण पाटणा विभागात आहे, तिथे फक्त 74.57 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सीबीएसई अभ्यासक्रमानुसार, 13109 शाळांमधील विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यासाठी 4984 परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली होती.

सर्वात चांगली कामगिरी जवाहर नवोदय विद्यालयांची

सीबीएसई बारावीच्या परीक्षेत मुलांच्या तुलनेत मुलीचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 5.96 टक्के जास्त आहे. तसंच सीबीएसई अभ्यासक्रमाच्या वेगवेगळ्या शाळांच्या वर्गवारीनुसार सर्वात चांगली कामगिरी जवाहर नवोदय विद्यालयांची आहे. देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयाचा सीबीएसई बारावीचा निकाल 98.70 टक्के म्हणजेच सर्वात चांगली कामगिरी करणाऱ्या तिरुवनंतपुरम विभागापेक्षाही सरस आहे. त्या खालोखाल केंद्रीय विद्यालय 98.62 टक्के, CTSA सेंट्रल तिबेटियन स्कूल अॅडमिनिस्ट्रेशन च्या शाळा 98.23, सरकारी विद्यालये 94.94 तर शासकीय अनुदानप्राप्त शाळांच्या निकालाची टक्केवारी 91.56 टक्के आहे. सर्वात कमी सीबीएसई अभ्यासक्रमाच्या मात्र खाजगी संस्थांच्या शाळांचा निकाल आहे. त्या शाळांची निकालाची टक्केवारी 88.22 टक्के आहे. सीबीएसईच्या दहावी-बारावी परीक्षा देणाऱ्या सुमारे 30 लाख विद्यार्थ्यांपैकी बारावीच्या परीक्षेसाठी 1203595 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती तर 1192961 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले होते, त्यापैकी 1059080 विद्यार्थी म्हणजे 88.78 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

Read More  बारावीचा निकाल जाहीर : सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या