24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeराष्ट्रीयसंपत्तीत नाव नोंदविणारा संपत्तीचा मालक नव्हे

संपत्तीत नाव नोंदविणारा संपत्तीचा मालक नव्हे

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : संपत्तीच्या मालकी हक्काबद्दल सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून, न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, म्यूटेशन एंट्री म्हणजे एखाद्याची मालमत्ता असेल आणि त्यावर एखाद्याने नाव नोंदविले असेल तर तो व्यक्ती त्या मालमत्तेचा मालक असू शकत नाही. न्यायालयाच्या मते, म्यूटेशन एंट्रीमुळे कोणत्याही व्यक्तीला कोणताही अधिकार किंवा हक्क मिळत नाही. ती केवळ आर्थिक हेतूंसाठी आहे. न्यायमूर्ती एम. आर. शाह आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

मालमत्तेच्या मालकीचा निर्णय फक्त दिवाणी न्यायालय करू शकतो. न्यायालयाच्या मते, नाकारलेली प्रवेशिका म्हणजेच म्यूटेशन एंट्री कोणत्याही व्यक्तीच्या हिताचा कोणताही निर्णय घेत नाही. मालमत्तेचे म्यूटेशन म्हणजे स्थानिक महापालिका किंवा तहसील प्रशासनाच्या महसूल रेकॉर्डमध्ये मालकी हस्तांतरित करणे किंवा बदलणे होय. न्यायमूर्ती एम. आर. शाह आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, मृत्युपत्र लिहणा-याच्या मृत्यूनंतरच मृत्यूपत्राच्या आधारावर हक्काचा दावा केला जाऊ शकतो, यात कसलाच वाद नाही आहे.

म्यूटेशन एंट्री केवळ आर्थिक हेतूसाठी
खंडपीठाने म्हटले आहे की, कायद्याच्या प्रस्तावानुसार, महसूल रेकॉर्डमध्ये केवळ म्यूटेशन एंट्री त्या व्यक्तीला मालमत्तेचा अधिकार किंवा मालकी देते ज्यात त्याचे नाव नोंदवले गेले आहे. महसूल रेकॉर्डमधील म्यूटेशन एंट्री ही केवळ आर्थिक हेतूसाठी आहे.

वारसा हक्कासाठी न्यायालयात जावे लागणार
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, जर मालकीबाबत काही विवाद असेल आणि विशेषत: जेव्हा वारसेच्या आधारावर म्यूटेशन एंट्री मागितली गेली असेल तर जो पक्ष मालकी किंवा हक्काचा दावा करत आहे.त्याला न्यायालयात जावे लागेल.

दिवाणी न्यायालयातून मिळेल अधिकार
अर्जदारांचे अधिकार केवळ सक्षम दिवाणी न्यायालयाद्वारेच मिळवता येतात आणि न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारावर आवश्यक म्युटेशन एंट्री करता येते असेही न्यायालयाने म्हटले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या