27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeराष्ट्रीयधावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान

धावपट्टीवरून घसरून दरीत कोसळले विमान

एकमत ऑनलाईन

कोझीकोड : केरळमधील कोझीकोड येथील करिपूर विमानतळावर एअर इंडियाचे विमान लँडिंग करताना शुक्रवारी रात्री धावपट्टीवरून घसरले आणि ते थेट दरीत जाऊन कोसळले. या भीषण अपघातात विमानाचे दोन तुकडे झाले आहेत. या विमानात १९० प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. रात्री पावणेआठच्या सुमारास घडली. त्यामुळे नुकसानाचा अंदाज लवकर आला नाही. मात्र, वैमानिक मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती आहे.

तसेच किती प्रवासी मृत झाले किंवा जखमी झाले. याचा अंदाज रात्री उशिरापर्यंत आला नव्हता. मात्र विमानातील प्रवाशांना वाचण्यासाठी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. एअर इंडियाच्या दुबई-कोझीकोड या विमानाला मोठा अपघात झाला आहे. हे विमान दुबईहून कालिकत येथे आले होते. केरळमधील कोझीकोड येथील करिपूर विमानतळावर हे विमान लँडिंग होत होते. लँडिंग करताना विमान धापट्टीवरून घसरले. त्यानंतर ते दरीत कोसळल्याने ही दुर्घटना घडली.

या विमानात ६ क्रू मेबर्स आणि २ दोन पायलटसह १९१ प्रवासी होते. विमान लँडिंग होत असताना धावपट्टीवरून घसरले आणि दरीत कोसळले. यामुळे विमानाचे दोन तुकडे झाले आहेत, अशी माहिती डीजीसीएने दिली. या प्रकरणी डीजीसीएने सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत, तर मदत आणि बचावकार्यासाठी एनडीआरफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही माहिती दिली. मदत आणि बचावकार्य वेगाने करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

Read More  मरीनविरुध्दचा खटला तूर्तास सुरूच राहील

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या