20.1 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeराष्ट्रीयअल्पसंख्याकावरील हल्ल्याचा कट उधळला

अल्पसंख्याकावरील हल्ल्याचा कट उधळला

एकमत ऑनलाईन

बारामुल्ला : पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईत आज उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील पट्टण भागात जैश-ए-मोहम्मदच्या दोन सक्रिय दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. बारामुल्लाच्या पोलिसांनी सांगितले की, दोन दहशतवादी एका वाहनातून श्रीनगरच्या दिशेने जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली.

राष्ट्रीय महामार्ग आणि लगतच्या लेनवर विविध ठिकाणी संयुक्त मोबाईल वाहन चेक नाके उभारण्यात आले आहेत. तपासणी दरम्यान, एका वेगात जाणा-या गाडीला थांबण्याचा इशारा देण्यात आला, परंतु गाडी अचानक थांबली, दोन व्यक्तींनी (चालक आणि सहचालक) वाहनातून उडी मारली, आणि त्यांनी जवळच्या जंगलीबाग परिसरात पळ काढला. मात्र, सुरक्षा दलांनी लोकांचा पाठलाग करून त्यांना पकडण्यात यश मिळविले.

जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना अटक
आकिब मोहम्मद मीर, बाटपोरा सोपोरचा रहिवासी आणि चांकण सोपोरचा रहिवासी दानिश अहमद दार अशी अटक केलेल्या दहशतवाद्यांची नावे असून ते जैशशी संबंधित असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्याकडून दोन पिस्तूल, दोन पिस्तुल मॅगझिन, १० राउंड पिस्तूल आणि दोन चायनीज ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत.

अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य
आतापर्यंतच्या तपासात असे समोर आले आहे की, दोघे दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे होते, त्यांना अल्पसंख्याक समुदायाचे सदस्य आणि समाजातील लोकांना लक्ष्य करायचे होते. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा दहशतवादी कट उधळून लावला आहे, जैश-ए-मोहम्मदच्या विविध दहशतवादी हल्ले करण्यास मदत करणा-या मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आल्याचे पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या