37.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeक्राइमतक्रारदार महिलेकडून पोलिस अधिका-याने करून घेतला मसाज

तक्रारदार महिलेकडून पोलिस अधिका-याने करून घेतला मसाज

एकमत ऑनलाईन

पाटणा : देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. तक्रारदार महिलेकडून पोलीस ठाण्यात असलेल्या एका अधिका-याने मसाज करून घेतल्याचा भयंकर प्रकार उघड झाला आहे.
बिहारमधील सहरसा जिल्ह्यातील नवहट्टा ब्लॉक अंतर्गत एका पोलीस ठाण्यात पोलिस अधिकारी तक्रारदार महिलेकडून तेलाने मालिश करून घेत असल्याचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये इन्स्पेक्टर शशिभूषण सिंह फोनवर कोणाशी तरी बोलत आहेत, तर महिला त्यांना तेलाने मसाज करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस स्टेशन अधिकारी शशिभूषण सिंह यांनी महिलेच्या असहायतेचा चुकीचा फायदा घेत बॉडी मसाज करण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

अधिका-याच्या संभाषणावरून असे दिसते की महिला अडचणीत आहे आणि अधिकारी तिचे काम करून देण्याच्या बदल्यात तिच्याकडून ही अशा प्रकराची सेवा करून घेत आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सोशल मीडियावर पोलिस अधिका-याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्याचे एसपी लिपी सिंह यांनी अधिकारी शशिभूषण सिंह यांना निलंबित केले आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये पिवळी साडी घातलेली एक महिला त्यांना मसाज करत आहे तर दुसरी महिला त्यांच्या समोर बसलेली दिसत आहे. पोलिस ठाण्यात उपस्थित असलेल्या कोणीतरी हा व्हिडीओ काढला असून आता तो व्हायरल होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या