26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयदेशात ‘फूट पाडा अन राज्य करा’ चे धोरण : ममता बॅनर्जी

देशात ‘फूट पाडा अन राज्य करा’ चे धोरण : ममता बॅनर्जी

एकमत ऑनलाईन

कोलकाता : देशात आज ज्या पद्धतीने ‘फूट पाडा आणि राज्य करा’ हे धोरण राबवले जात आहे ते योग्य नसून, एकटेपणाचे राजकारण सुरू आहे. ते योग्य नाही, असे मत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी काही लोक हिंदू आणि मुस्लमानांना वेगळे करण्याविषयी बोलत आहेत. मात्र, तुम्ही त्यांचे ऐकू नका असे त्यांनी यावेळी सांगितले. ईदनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

केंद्र सरकारवर निशाणा साधत ममता म्हणाल्या की, ‘अच्छे दिन आएंगे, परंतु हे खोटे अच्छे दिन असणार नाहीत असे म्हणत, अच्छे दिन येणार, सगळ्यांच्या सोबत येणार. सर्वांना एकत्र राहायचे आहे, एकत्र काम करायचे असून, दिशाभूल करणा-या आणि हिंदू-मुस्लमानांना वेगळे करणा-यांचे ऐकू नका असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.

देशातील परिस्थिती योग्य नाही. फूट पाडा आणि राज्य करा हे धोरण आणि देशात सुरू असलेले वेगळेपणाचे राजकारण योग्य नाही. मात्र, तुम्ही घाबरू नका आणि लढत राहा. मी, माझा पक्ष किंवा माझे सरकार असे काहीही करणार नाही, ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल, असे आश्वासनही यावेळी ममता यांनी दिले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या