31.7 C
Latur
Friday, March 31, 2023
Homeऔरंगाबादनामांतराच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापले

नामांतराच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापले

एकमत ऑनलाईन

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलून धाराशिव करण्यात आले आहे. मात्र याच निर्णयावरून आता जिल्ह्यातील राजकारण तापले आहे. नामांतराच्या निर्णयाचे कुठे समर्थन होत आहे तर कुठे विरोध करण्यात येत आहे.

दरम्यान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी या निर्णयाला विरोध करत, आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे मनसेकडून आज शहरात नामांतराच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबवली जात आहे.

त्यामुळे आगामी काळात नामांतराच्या मुद्यावरून राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.
नामांतराच्या निर्णयाला एमआयएमने विरोध केल्यावर मनसेकडून जलील यांच्यावर टीका करण्यात आली होती. तर नामांतराच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी जलील रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असतील, तर आम्ही देखील आंदोलन करून उत्तर देऊ असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी दिला होता.

दरम्यान जलील यांनी उपोषणाची घोषणा करताच मनसेकडून देखील स्वाक्षरी मोहीम हाती घेण्यात आली आहे. आज शहरातील टीव्ही सेंटर भागातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण!
नामांतराच्या निर्णयाच्या विरोधात आजपासून एमआयएम रस्त्यावर उतरणार असून, छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दुपारी तीनपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात होणार आहे. यावेळी उपोषणाला खासदार इम्तियाज जलील यांच्यासह एमआयएमचे अनेक नेते देखील उपस्थित राहणार आहेत. औरंगाबाद नामांतर कृती विरोधी समितीच्या अंतर्गत हे उपोषण केले जाणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या