नवी दिल्ली : पाचवा आयुर्वेद दिवसाचे निमित्त साधून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन आयुर्वेद संस्था देशाला समर्पित करणार आहेत. गुजरातच्या जामनगरमधील भारतीय आयुर्वेद शिक्षण आणि संशोधन (आयटीआरए) आणि राजस्थानमधील जयपूरची राष्ट्रीय आयुर्वेद संस्था आज देशाला समर्पित करण्यात येणार आहे. आयुष मंत्रालयाकडून ही माहिती दिली आहे.
आयटीआरएला संसदेत कायद करुन महत्त्वाच्या राष्ट्रीय संस्थेचा दर्जा देण्यात आला आहे. तर जयपूरच्या आयएनएला यूजीसीद्वारे मानद विद्यापीठाचा (डीम्ड टू बी यूनिवर्सिटी) दर्जा मिळाला आहे. कायद्याद्वारे दर्जा मिळालेले जामनगरचे आयटीआरए जागतिक स्तरावरील आरोग्य देखभाल केंद्र म्हणून काम करणार आहे. यामध्ये 12 विभाग, तीन क्लिनिकल प्रयोगशाळा आणि तीन संशोधन प्रयोगशाळांचा समावेश आहे.
पारंपरिक औषधांच्या क्षेत्रात ही संस्था अग्रगण्य आहे. सध्या इथे 33 संशोधन योजना सुरु आहेत. गुजरात आयुर्वेद विद्यापीठ परिसरातील चार आयु्र्वेद संस्था मिळून आयटीआरएची स्थापना करण्यात आली आहे. आयुष क्षेत्रातील ही पहिली संस्था आहे ज्याला राष्ट्रीय महत्त्वाचा दर्जा प्रदान केला आहे. संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या राष्ट्रीय आयुर्वेद संस्था (एनआयए) ला मानद विद्यापीठाचा दर्जा प्राप्त आहे. या विद्यापीठाला 175 वर्षांचा वारसा आहे. मागील काही दशकांमध्ये आयुर्वेदाचे संरक्षण आणि ते पुढे नेण्यात या संस्थेचं मोलाचे योगदान आहे. सध्या एनआयएमध्ये 14 विविध विभाग आहेत.
राज्यात १६ लाख रुग्ण कोरोनामुक्त रुग्णसंख्या घटली, ४ हजार ४९६ नवे रुग्ण