24.9 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeराष्ट्रीयमहागाई नसावी हे पंतप्रधानांचे ध्येय

महागाई नसावी हे पंतप्रधानांचे ध्येय

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : महागाई, पेट्रोलचे भाव याबाबतही पंकजा मुंडे यांनी मंगळवार दि. १९ ऑक्टोबर रोजी भाष्य केले असून, राष्ट्रीय सचिव म्हणून मला असे वाटते की या महागाईवर तोडगा निघायला पाहिजे. महागाई नसली पाहिजे, सामान्य माणसांना चांगले दिवस आले पाहिजेत, असेच पंतप्रधानांचे ध्येय आहे आणि लवकरच त्यावर तोडगा निघेल, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या बैठकीसाठी पंकजा मुंडे दिल्लीत दाखल झाल्या होत्या. त्यानंतर ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केले आहे. बैठक हा आमचा दिनक्रमाचा भाग आहे. अंत्योदयचा संस्कार पक्षात असल्याने या बैठकीत चर्चा झाली. अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. निवडणुका लढण्यामागे सुद्धा भाजपाचा एक हातखंडा आहे. मी मध्य प्रदेशची प्रभारी असल्याने तिथे प्रचाराला जाणार आहे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या