25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeमहाराष्ट्रबाटलीत डास भरत कैद्याने थेट कोर्टच गाठले

बाटलीत डास भरत कैद्याने थेट कोर्टच गाठले

एकमत ऑनलाईन

मुंबई : सध्या डेंग्यूची साथ देशभर पसरली आहे. आतापर्यंत हजारो लोकांना याचा फटका बसला आहे. या धोकादायक आजारामुळे अनेकांचा मृत्यूही झाला आहे. डासांच्या या समस्येमुळे कारागृहातील कैदीही हैराण झाले आहेत. मुंबईच्या तळोजा कारागृहातही कैद्यांना डासांचा त्रास जाणवू लागला आहे.

एका कैद्याने तुरुंगात मच्छरदाणी वापरण्याची परवानगी मिळण्यासाठी एक अनोखा मार्ग निवडला. त्याने कारागृहातील डास एका बाटलीत भरले आणि कोर्ट गाठले. त्याने कोर्टात न्यायाधीशांना सांगितले की, त्याला आणि इतर कैद्यांना डासांचा त्रास होत आहे. अशा परिस्थितीत आम्हाला मच्छरदाणी वापरण्याची परवानगी द्यावी. यावर कोर्टाने म्हटले, ‘आरोपीला ओडोमॉस आणि इतर रिपेलंट वापरण्याची परवानगी आहे, अशा स्थितीत आम्ही आपली ही याचिका फेटाळत आहोत.’

ही घटना गुरुवारी मुंबईच्या सत्र न्यायालयात घडली. तळोजा कारागृहातील कैदी एजाज लकडावाला याच्यावर अनेक प्रकारचे फौजदारी खटले सुरू आहेत. त्याची प्रकरणं न्यायालयात प्रलंबित आहेत. लकडावाला कोर्टात पोहोचला आणि त्याने डासांनी भरलेली बाटली न्यायाधीशांना दाखवली आणि सांगितले की, ‘तुरुंगातील डासांमुळे मला आणि इतर कैद्यांना खूप त्रास होत आहे. अशा परिस्थितीत आम्हाला इतर कैद्यांप्रमाणे मच्छरदाणी वापरण्याची परवानगी द्यावी.’

लकडावाला व्यतिरिक्त, अनेक तुरुंगांतील कैद्यांनी इतर न्यायालयांत अशाच याचिका दाखल केल्या आहेत. मात्र, न्यायालयाने लकडावालाची याचिका फेटाळून लावली. लकडावालाला २०२० मध्ये कोर्टाने न्यायालयीन कोठडीत पाठवले होते. तेव्हापासून तो तळोजा कारागृहात आहे. त्याने सांगितले की, ‘त्यावेळी मला मच्छरदाणी वापरण्याची परवानगी होती. पण, मे महिन्यात कारागृहात शोधमोहीम राबवण्यात आली, त्यावेळी माझी मच्छरदाणी जप्त करण्यात आली.’ कारागृहातील अनेक कैद्यांना मच्छरदाण्या देण्यात आल्याचेही लकडावालाने सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या