नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाचे कामकाज मंगळवारी पहिल्यांदा लाईव्ह ट्रान्सक्राईब अर्थात लिखित स्वरुपात दाखवण्यात आले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग टेक्नॉलॉजीच्या मदतीनं हे लाईव्ह ट्रान्सक्रिप्शन करण्यात आले.
या योजनेच्या माध्यमातून कोर्टाचं प्रोसडिंग आवाज आणि टेक्स्टच्या स्वरुपात स्क्रीनवर दाखवण्यात आले. यामुळे कोर्टाचे कामकाज आता लाईव्ह वाचता येणार आहे. ज्या लोकांना कमी ऐकू येते किंवा ऐकण्यात अडचण येते, त्यांना याचा मोठा फायदा मिळेल.
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी लाईव्ह ट्रान्स्क्रिप्शन मंगळवारी कोर्टात लॉन्च केले. राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने ट्रान्सक्राईब केले होते. यानंतर वकील याची तपासणी करतील त्यानंतर सर्वकाही ठीकठाक असल्याचे दिसून आल्यानंतर त्याला सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात येणार आहे. सरन्यायाधीशांनी म्हटले की, आता हे प्रायोगित तत्वावर करण्यात येत आहे. सर्वकाही योग्य प्रकारे होऊ लागल्यानंतर याला कायमस्वरुपी लागू करण्यात येईल.
गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये सुप्रीम कोर्टाचे कामकाज लाईव्ह टेलिकास्ट करण्याची सुरुवात करण्यात आली होती. ज्याअंतर्गत सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर कोर्टाचं कामकाज लाईव्ह पाहता येतं. आता कारवाई पाहणं आणि ऐकण्याबरोबर ते वाचताही येऊ शकतं