24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यात सप्टेंबर महिन्यात वाढणार पावसाचा जोर; हवामान खात्याचा अंदाज

राज्यात सप्टेंबर महिन्यात वाढणार पावसाचा जोर; हवामान खात्याचा अंदाज

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्र राज्यासह इतरत्र पावसाचा जोर ओसरला आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. काही ठिकाणी मात्र, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मुंबईसह ठाणे परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. इतर ठिकाणी मात्र, पावसाने उघडीप दिली आहे.

दरम्यान येत्या चार ते पाच दिवसांत महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी असण्याची शक्यता असून, हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर गणरायाचे आगमन झाल्यानंतर म्हणजेच १ सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

त्याचबरोबर, पुढचे काही दिवस राज्यात पाऊस विश्रांती घेईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर दुसरीकडे आजपासून पुढील दोन दिवस विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर इतर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अतिवृष्टीचा मोठा फटका विदर्भ आणि मराठवाड्याला बसला आहे. अशातच राज्यात आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जूनपासून आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. नदी आणि धरणांच्या पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे.

जुलै आणि ऑगस्टमध्ये राज्यात सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली. या दरम्यान, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला होता. तसेच शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. सर्व धरणे भरली आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या