मुंबई: राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवडयात ११.७ दिवस होता. तो आता १७.५ दिवस झाला आहे. देशाचा रुग्ण दुपटीचा वेग १५.७ दिवस आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) ४३.३५ टक्के एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर ३.३७ टक्केवर आला असून २ हजार ४८७ रूग्णांचे निदान झाले आहे. तर ८९ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रूग्णांची संख्या ६७ हजारावर पोहोचली तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ३६ हजारावर पोहोचल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात आज १२४८ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २९ हजार ३२९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३६ हजार ३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ६२ हजार १७६ नमुन्यांपैकी ६७ हजार ६५५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४४ शासकीय आणि ३४ खाजगी अशा ७८ प्रयोगशाळा निदानासाठी कार्यरत असून राज्यातील प्रयोगशाळा चाचण्यांचे प्रमाण प्रति दशलक्ष ३५८५ एवढे असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात आज 2487 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 67655 अशी झाली आहे. आज नवीन 1248 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 29329 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 36031 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) May 31, 2020