25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रबंडखोर आमदारांनी मविआ सरकारचा पाठिंबा काढला, याचिकेत दावा

बंडखोर आमदारांनी मविआ सरकारचा पाठिंबा काढला, याचिकेत दावा

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टात पोहचला आहे. बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. मात्र, त्याआधीच मोठी बातमी समोर आली आहे. बंडखोर ३८ आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेत सरकारचा पाठिंबा काढला असल्याचा दावा केला आहे. महाविकास आघाडीकडून विधानसभा उपाध्यक्षांचा दुरुपयोग सुरू असल्याचा दावा शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी केला आहे.

महाराष्ट्रातल्या सत्ताकारणाचा खेळ अखेर अपेक्षेप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात पोहचला. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेनेकडून होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाई विरोधात शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. बंडखोर आमदारांवर होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. तसेच अजय चौधरींच्या गटनेते पदाला शिंदे गटाचा आक्षेप असल्याची याचिका देखील दाखल करण्यात आली आहे.

बंडखोर आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेत विधानसभा उपाध्यक्षांनी सुरू केलेली अपात्रतेची कारवाई थांबवण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. महाविकास आघाडीचा ३८ आमदारांनी पांिठबा काढला आहे. त्यामुळे सरकारने बहुमत गमावले आहे. त्यानंतरही विधानसभा उपाध्यक्ष कार्यालयाचा दुरुपयोग राज्य सरकारने सुरू केला असल्याचे बंडखोर आमदारांनी याचिकेत म्हटले आहे.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली आहे. या आमदारांना २७ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत उत्तर द्यावे लागणार आहे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. आमदार अपात्र ठरल्यास शिंदे गटाला मोठा धक्का बसणार आहे. मात्र, त्यापूर्वी आता सुप्रीम कोर्ट आज सुनावणीत काय निर्देश देणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे

एकनाथ शिंदे यांच्या याचिकेतील मुद्दे
१. विधानसभा अध्यक्षांनी १६ आमदारांना आज ५ वाजे पर्यंत म्हणणे मांडण्याची मुदत दिलीय. विधानसभेच्या नियमांनुसार ७ दिवसांचा वेळ द्यावा लागतो. परंतु स्पीकरनं २ दिवसांचा कालावधी दिलाय. त्यामुळे उपाध्यक्षांच्या नोटीसाला स्थिगिती देण्याची मागणी एकनाथ शिंदे गटानं केलीय.
२. स्पीकरच्या विरोधात अविश्वास ठराव आणला आहे. ३४ जणांची सही आहे.. यावर कोर्टानं निर्णय घ्यावा.

३. अजय चौधरीं आणि सुनिल प्रभूंची गटनेता आणि प्रतोद पदाची नियुक्ती चुकीच्या पद्धतीने केली आहे. या दोघांच्या नियुक्तीला स्थगिती द्या. कारण १७ आमदारांच्या सहीने ठराव करून गटनेते पद दिलं गेलं. पण आमच्याकडे जास्त आहेत. यात दुसरा मुद्दा: त्या ठरावात २४ आमदारांनी सह्या केल्या आहेत. त्यापैकी दादा भुसे आणि उदय सामंत , केसरकर यांसह १० आमदार एकनाथ शिंदे गटात आले आहेत. त्यांनी आपला निर्णय वापस घेतला आहे..

४ . एकनाथ शिंदे गटाच्या १६ जणांवर शिस्तभंग कारवाईची केली. पण त्यातील पण काही आमदार एकनाथ शिंदे गटाकडे आले.

५. गटनेत्यांची नियुक्ती हे निवडून आलेले आमदार करतात, पक्ष प्रमुख नाही. म्हणून स्पीकरनं अजय चौधरींची केलेली नियुक्ती चुकीची आहे.

६. एकीकडे आम्हाला बोलवता आणि दुसरीकडे संजय राऊत आम्हाला धमक्या देत आहेत जीवे मारण्याची धमकी देताहेत.

७. सुनिल प्रभू आणि अजय चौधरींनी पक्षाचे लेटर हेड वापरू नये असे याचिकेत दिले आहेत.

८. ऊपसभापती कार्यालयाचा गैरवापर केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या