मुखेड : प्रतिनिधी
मुखेड तालुक्यात कोरोना संक्रमित तीन रुग्ण असून तिघांचीही तब्येत स्थिर आहे. तर पांडूर्णी येथे मुंबईहून आलेल्या तालुक्यातील पहिला कोरणा पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सहा जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला आहे.
Read More यंदाची ईद साजरी न करता मजुरांना मदत
मुखेड तालुक्यात मुंबई-पुणे या शहरातून आलेल्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मागील अडीच महिन्यात मुखेड तालुक्यात एकही रुग्ण कोरोना बाधित आढळला नव्हता. मात्र या मोठ्या शहरातून परतलेल्या तिघांना कोरोनाचे संक्रमण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील मुंबई येथून आलेला नायगाव तालुक्यातील टेंभुर्णी येथील तरुण काही दिवसापासून पांडुर्णी येथील शेतात वास्तव्यास होता. त्याची तब्येत बिघडल्याने तो स्वत:हून कोव्हीड केअर सेंटरमध्ये दाखल झाला होता.
त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सहा जणांना आरोग्य विभागाने तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करून घेतले होते. या सहा जणांच्या स्वपचे आवहाल निगेटिव्ह आले आहेत. ही मुखेडकरांसाठी समाधानाची बाब असून तालुक्यातील रावणकोळा येथील आई व मुलगा हे दोन कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचे अवहाल अजूनही प्राप्त झालेले नसून त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा संबंध तालुक्याला असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान तिन्ही कोरोना बाधित रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.