29.8 C
Latur
Saturday, December 3, 2022
Homeराष्ट्रीयराजस्थानमधील तिढा कायम

राजस्थानमधील तिढा कायम

एकमत ऑनलाईन

गेहलोत यांच्यावर पक्षश्रेष्ठी नाराज, अध्यक्षपदासाठी दुसरे नाव?
नवी दिल्ली : राजस्थानात गेहलोत गटाचा सचिन पायलट यांना विरोध कायम आहे. गेहलोत गटाच्या आमदारांनी राजीनामानाट्य सुरू केले. कालपासून येथील तिढा कायम आहे. दरम्यान, गेहलोत समर्थक आमदारांच्या राजीनामानाट्याची काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे आता अशोक गेहलोत यांचे नाव काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यातीतून वगळले जाऊ शकते. नवी दिल्लीत १० जनपथ या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी होणा-या बैठकीपूर्वी याबाबतची माहिती समोर आली आहे.

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अशोक गेहलोत हे प्रमुख दावेदार मानले जात होते. अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्षपद अशी दोन्ही पदे हवी होती. मात्र, पक्षाच्या एक व्यक्ती एक पद धोरणानुसार अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागणार होता. गेहलोत यांच्या जागी सचिन पायलट मुख्यमंत्री होण्यास पक्षाच्या आमदारांनी विरोध दर्शवला होता. गेहलोत समर्थक आमदारांनी दबावतंत्र वापरत राजीनामास्त्र बाहेर काढले होते.

काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी आता मोठा निर्णय घेत अशोक गेहलोत यांना पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अशोक गेहलोत यांच्याऐवजी मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खर्गे, दिग्विजय सिंह आणि के. सी. वेणुगोपाल यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या एका सदस्याच्या माहितीनुसार अशोक गेहलोत यांच्या समर्थकांच्या वर्तनामुळे वरिष्ठ नेत्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

३० सप्टेंबरला चित्र स्पष्ट होणार
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी खासदार शशी थरुर यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनी अर्जदेखील घेतला आहे. अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर आहे. त्या दिवशी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोण कोण असेल, हे स्पष्ट होणार आहे. काँग्रेसचे राजस्थान निरीक्षक अजय माकन आणि मलिल्कार्जून खर्गे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली असून त्यांना राजस्थानमधील राजकीय स्थितीची माहिती दिली आहे.

 

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या