23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रगुवाहाटीला जाण्याचा मार्ग मोकळा होता, पण नाही गेलो

गुवाहाटीला जाण्याचा मार्ग मोकळा होता, पण नाही गेलो

एकमत ऑनलाईन

मुंबई : एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत हे कालच उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे, त्यांच्यावरील कारवाई ही शिस्तभंगाची कारवाई आहे, असे संजय राऊत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. कालच्या ईडी चौकशीवरही संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना भाष्य केले आहे.

तसेच, राज्यात नवे सरकार, नवीन विटी, नवीन दांडू, असे म्हणत राऊतांनी नवनिर्वाचित सरकारला टोला हाणला आहे. त्याचप्रमाणे, मलाही गुवाहाटीला जाण्याचा मार्ग मोकळा होता, दबावही होता, पण मी गेलो नाही, असा खळबळजनक खुलासाही राऊतांनी केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, आपला जो अंतरात्मा असतो तो सांगतो की, मी काही केलेलं नाही, तपास यंत्रणांना सामोरे जायला पाहिजे. त्याच आत्मविश्वासाने मी गेलो आणि दहा तासांनी बाहेर आलो. मलाही गुवाहाटीला जाण्याचा मार्ग मोकळा होता, पण मी नाही गेलो. आम्ही बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, शिवसेना यांच्यासोबत राहिलो. स्वाभिमानाच्या गोष्टी करायच्या, हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या आणि असं वागायचं, हे आमच्या रक्तात नाही.

प्राण जाये, पर वचन ना जाये, हे आम्हाला बाळासाहेबांनी आणि हिंदुत्वाने शिकवलेले आहे. मी या बाबतीत अत्यंत बेडर आहे. इतरांनाही मी सांगतो, जर सत्य तुमच्या बाजूने असेल तर घाबरण्याची गरज नाही. मी काल अधिका-यांना सांगितले, बॅग भरून आलोय आणि मी घाबरणार नाही. तुम्हाला जे हवेत ते प्रश्न विचारू शकता. तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करतो.

फडणवीसांच्या मागे ‘उप’ शब्द लावायला जड जातंय
मला तोंडात अजून उपमुख्यमंत्री येत नाही. माजी मुख्यमंत्री किंवा भावी मुख्यमंत्री असे सतत आपण त्यांना बोलत राहिलो. पण ‘उप’ हा शब्द त्यांच्या मागे लावायला मला जड जात आहे. तरीही मी देवेंद्रजींच्या संदर्भात होत असेल तर त्यांचा हा पक्षाचा प्रश्न आहे, असे संजय राऊत म्हणाले. तसेच, जे मुख्यमंत्रिपदाच्या तयारीत होते. पक्षाची बैठक होते. त्यांना दुस-या क्रमांकाचे पद स्वीकारा असे सांगितले जाते. जे मुख्यमंत्री झाले ते त्यांच्या मंत्रिमंडळात ज्युनिअर होते. पण भाजपमध्ये शिस्त आणि आदेशाचे पालन केले जाते. त्यानुसार ते वागले. त्यांचे त्यासाठी कौतुक केले पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.

मी फुटणारा बुडबुडा नाही
राज्यसभा निवडणुकीत मला पाडण्याचा प्रयत्न झाला. मी राज्यसभा निवडणुकीत पडलो असतो, तरी मी शिवसेना सोडली नसती, मी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसोबत राहिलो असतो. मी बाळासाहेब यांच्या मूळ विचाराचा माणूस आहे. मी फुटणारा बुडबुडा नाही, असेही राऊत म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या