नाशिक : नाशिक महापालिकेतील रस्ते झाडण्यासाठी पालिकेने यांत्रिक झाडू (स्वीपिंग मशिन) खरेदी करण्याचा भाजपने घेतलेला निर्णय विद्यमान आयुक्तांनी काही काळासाठी बाजूला ठेवला होता. मात्र आता आयुक्तांनी याला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यानुसार प्रत्यक्ष स्वीपिंग मशिनचे काम पाहण्यासाठी दोन अधिकारी गुजरातमधील भावनगर येथे गेले आहेत.
नाशिक महापालिका पहिल्या पंचवार्षिकपासून यांत्रिक झाडू खरेदी करणार अशा चर्चा होत्या. मात्र कामगार संघटनेच्या विरोधामुळे अनेकदा हा प्रस्ताव बारगळला होता.
गेल्या वर्षी भाजपची सत्ता असताना अशा प्रकारचा यांत्रिक झाडू खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र अडीच कोटी रुपयांचा हा यांत्रिक झाडू आणि दुरुस्ती खर्च मिळून सुमारे दहा कोटी खर्च जात असल्याने त्यावेळी यावरून वाद निर्माण झाला.