मुंबई : फडणवीस भाषण करताना म्हणाले, देशाच्या इतिहासातील सर्वांत तरुण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर झाले आहेत. सर्वांत शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचे काम आम्ही करीत आहोत. छोट्यातील छोटा प्रश्न असो की मोठा प्रश्न सोडवण्याची क्षमता या सभागृहात आहे.
अध्यक्षांची भूमिका न्यायमूर्तींसारखी आहे. ज्याच्या बाजूने निर्णय येतो त्याला न्याय वाटतो, ज्याच्या विरोधात निर्णय येतो त्यांना अन्याय वाटतो. सर्व बाजूत एक तिसरी बाजू खरी असते. त्या बाजूला प्रतिध्वनित करण्याचे काम विधानसभा अध्यक्षांना करावी लागते असे ते म्हणाले.
फडणवीस म्हणाले की, कायद्यात निश्चितपणे काय आहे हे समजून घेत न्यायालयाच्या कसोटीवर आपला कायदा टिकावा यासाठी आपले काम महत्त्वाचे आहे. या कायदेमंडळात कायद्याच्या अभ्यासकाला संधी मिळाली हे भाग्य आहे असेही फडणवीस म्हणाले.