27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांच्या दौ-यासाठी ‘एसटी’चा मार्ग बदलला

मुख्यमंत्र्यांच्या दौ-यासाठी ‘एसटी’चा मार्ग बदलला

एकमत ऑनलाईन

पैठण : माझ्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल देऊन लोकांना वाहतुकीत अडवून ठेवू नका, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी पोलिसांना दिले होते. मात्र प्रत्यक्षात औरंगाबाद येथील पैठण दौ-यात रस्त्यावरील एसटीच्या बसेस बंद करण्याच्या निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. तर एसटीने प्रवास करणा-या प्रवाशांनी याबद्दल नाराजी व्यक्ती केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौ-यावर असून, पैठण येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री औरंगाबादला पोहोचल्यावर पैठणला जाताना, या दौ-यावेळी औरंगाबाद-पैठण रोडवरील एसटी बसेस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच गरज पडल्यास पाचोडमार्गे या एसटी बसेस धावतील असाही निर्णय घेण्यात आला आहे.

मात्र यामुळे याचा फटका चितेगाव, बिडकीन, ढोरकीन, कारकीन पिपळवाडीसाठी प्रवास करणा-या प्रवाशांना बसणार आहे. विशेष म्हणजे या मार्गावरून अनेक विद्यार्थी सुद्धा एसटी बसने प्रवास करतात. त्यामुळे याचा फटका महाविद्यालयात जाणा-या विद्यार्थ्यांना सुद्धा बसणार आहे.

एसटी महामंडळाने काढलेल्या पत्रात केलेल्या उल्लेखानुसार, दिनांक १२ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११ वाजेनंतर पैठणहून औरंगाबादकडे व औरंगाबाद हून पैठणकडे जाणा-या बसेस या मुख्यमंत्री हे पैठण येथे पोहचेपर्यंत अंदाजे ११.३०वाजेपर्यंत बिडकीन मार्गे जाणार नाहीत. प्रवाशी यांना आवश्यकता वाटल्यास त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रवाशी उपलब्धतेनुसार पाचोड मार्गे बसेस पाठविण्याचे निर्णय पैठण स्थानक प्रमुख घेतील व औरंगाबाद येथे असाच निर्णय औरंगाबाद आगार क्र. २ चे स्थानकप्रमुख हे घेतील.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या