22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रटीईटी घोटाळ्यात नाव आलेल्या अब्दुल सत्तारांच्या मुलींचे वेतनही थांबवले

टीईटी घोटाळ्यात नाव आलेल्या अब्दुल सत्तारांच्या मुलींचे वेतनही थांबवले

एकमत ऑनलाईन

पुणे : टीईटी घोटाळ्यात रोज नवनवीन माहिती समोर येत असतांना आता कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याबाबतीत आणखी एक माहिती समोर आले आहे. सत्तार यांच्या ज्या मुलांचे नाव टीईटी घोटाळ्यात आली होती आता त्यांचे वेतन थांबवण्याचा आदेश शिक्षण विभागाने काढला आहे. सत्तार यांच्या मुली शेख हीना कौसर अब्दुल सत्तार आणि शेख ऊझमा नाहीद अब्दुल सत्तार या दोन्हीचे वेतन थांबवण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी राज्याचे कृषमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावं टीईटी घोटाळ्यात आल्याने मोठी खळबळ उडाली होती. यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप सुद्धा झाले. त्यानंतर आता शिक्षण विभागाने टीईटी परिक्षेतील बोगस उमेदवारांचे वेतन थांबवण्याचे आदेश काढले आहे. प्रशासनाने एकूण १ हजार ३३ शिक्षकांचे वेतन थांबवण्याचा आदेश काढला आहे. ज्यात ५७६ शिक्षक हे प्राथमिकचे तर ४५७ शिक्षक माध्यमिकचे आहेत. विशेष म्हणजे याच वेतन थांबवण्याच्या यादीत अब्दुल सत्तार यांच्या मुली शेख हीना कौसर अब्दुल सत्तार आणि शेख ऊझमा नाहीद यांचे सुद्धा नाव आहे.

वेतन थांबवण्याचे आदेश
शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ मध्ये ७८७४ उमेदवारांनी गैरप्रकार केल्याने त्यांना अपात्र करण्यात आले होते. या सर्व उमेदवारांची यादी १० ऑगस्ट २०२२ नुसार महाआयटी मुंबई यांच्याकडे उमेदवार यांच्या नावानुसार, आधार क्रमांकानुसार मॅंिपग करण्यासाठी देण्यात आली होती. तर महाआयटीकडून प्राप्त यादीनुसार अपात्र उमेदवारांपैकी ५७६ उमेदवार राज्यातील जिल्हा परिषद, मनपा, नगरपालिकासह इतर शाळांमध्ये शिक्षण सेवक आणि सहशिक्षक पदावर कार्यरत आहेत. विशेष हे सर्वजण शालार्थ प्रणालीद्वारे वेतन अनुदान घेत आहे.त्यामुळे या सर्व उमेदवारांचे वेतन थांबवण्याचे आदेश शिक्षण विभागाने काढले आहे.

घोटाळ्यात आता शिक्षण अधिका-याच्या मुलीचे नाव
अब्दुल सत्तार यांच्या मुलींचे नाव टीईटी घोटाळ्यात आले असताना आता, औरंगाबादचे शिक्षण अधिकारी मधुकर देशमुख यांच्याच मुलीचे या टीईटी घोटाळ्यात नाव आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने परीशिष्ट अ मध्ये नमूद केलेल्या पाच हजार सातशे उमेदवारांच्या गुणामध्ये फेरफार करून अपात्र असतांना देखील अंतिम निकलामध्ये पात्र जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये देशमुख यांच्या मुलीचे नाव आहे. तर माझी मुलगी सद्या कुठेही नोकरीला नसून तिने कोणत्याही प्रकारे लाभ घेतला नसल्याची प्रतिक्रिया देशमुख यांनी दिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या