26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमहाराष्ट्रकोणत्याही आमदाराची सुरक्षा काढलेली नाही

कोणत्याही आमदाराची सुरक्षा काढलेली नाही

एकमत ऑनलाईन

मुंबई : कोणत्याही बंडखोर आमदार आणि मंत्र्याची सुरक्षा काढण्यात आलेली नाही. एकनाथ शिंदे यांच्याकडून जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवली जात आहे, असा दावा गृहखात्याने केला आहे.

राजकीय आकसाने मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी बंडखोर आमदारांची सुरक्षा काढली असा आरोप एकनाथ शिंदे यांनी ट्विटद्वारे केला होता. परंतु गृहखात्याने एकनाथ शिंदे यांचे आरोप फेटाळले आहेत.

गृह विभागाने याबाबत ट्विट करून माहिती दिली. ‘राज्यातील कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश मुख्यमंत्री वा गृहविभागाने दिलेले नाहीत. या संदर्भात ट्विटरद्वारे केले जाणारे आरोप पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहेत, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले’, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदे सध्या बंडखोर आमदारांसह गुवाहाटीमध्ये आहेत. इथल्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये सगळ्या आमदारांचा मुक्काम आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या