23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रविरोधकांचा भाव वाढतोय, शिवसैनिकांच्या मनातील घाव वाढतोय

विरोधकांचा भाव वाढतोय, शिवसैनिकांच्या मनातील घाव वाढतोय

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे. आपला गट म्हणजेच शिवसेना असल्याचे म्हणत त्यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी पंगा घेतला आहे. शिंदे आणि ठाकरे यांच्यातील संघर्षावर सेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी एक ट्विट केले आहे.

देवा लवकर आटप रे हे सगळं, हॉटेलचे बिल वाढतेय, विरोधकांचा भाव वाढतोय, एऊ ची नोटीस लाव वाढतोय, शिवसैनिकांच्या मनातील घाव वाढतोय, आमदारांचा ताव वाढतोय, विधिमंडळातील डाव वाढतोय, लवकरात लवकर महाराष्ट्राच्या जनतेला चांगले दिवस दाखव रे महाराजा! होय महाराजा!, असे सय्यद यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दीपाली सय्यद या नेहमी राजकीय घडामोडींवर भाष्य करत असतात. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी एक ट्विट केले होते. सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मला शिवसेनेत घेऊन आले. माननीय उद्धवसाहेब ठाकरे साहेबांनी मला शिवसेनेत वावरायला शिकवले. दोन्ही बाजू गुरूचरणी, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? आमची निष्ठा-प्रतिष्ठा शिवसेनेच्या चरणी. भविष्यात जे होईल त्याचा स्वीकार करू, असे दीपाली सय्यद यांनी म्हटले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या