20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeमहाराष्ट्रशिंदे गटाकडून चिन्हासाठी पुन्हा तीन पर्याय सादर

शिंदे गटाकडून चिन्हासाठी पुन्हा तीन पर्याय सादर

एकमत ऑनलाईन

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर दोन्ही गटाकडून चिन्हं सादर करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने शिंदे गटाची चिन्हं नाकारल्यानंतर शिंदे गटाकडून पुन्हा तीन चिन्हं निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली आहेत. इमेल करून हे तीन पर्याय सादर करण्यात आले आहेत. तळपता सूर्य, ढाल, तलवार आणि पिंपळाचे झाड हे तीन पर्याय शिंदे गटाकडून देण्यात आले आहेत.

दरम्यान, शिंदे गटाकडून रिक्षा हे चिन्ह सादर करण्यात येणार असल्याची चर्चा होती. दुसरे चिन्ह तुतारी फुंकणारी व्यक्ती आणि तिसरे चिन्ह शंख अशी चर्चा सध्या होत होती पण शिंदे गटाकडून तळपता सूर्य, ढाल, तलवार आणि पिंपळाचे झाड हे तीन चिन्हं सादर करण्यात आली आहेत.

तर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने तीन चिन्हं सादर केले होते. त्यामध्ये उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूळ असे तीन पर्याय दिले होते. त्यातील मशाल या चिन्हावर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केले. त्यानंतर ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव ठाकरे गटाला देण्यात आले आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव देण्यात आले आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार शिंदे गटानेही तीन चिन्हं सादर केले होते. त्यामध्ये उगवता सूर्य, त्रिशूळ आणि गदा हे तीन पर्याय दिले होते तर दोन्ही गटांनी सादर केलेल्या चिन्हांपैकी दोन चिन्ह सारखे असल्यामुळे ते कुणालाच देण्यात आले नाहीत. गदा हे चिन्ह निवडणूक आयोगाने नाकारत शिंदे गटाला दुसरे पर्याय देण्यास सांगितले होते. त्यानंतर आता इमेल करत शिंदे गटाने तीन निवडणूक चिन्हं सादर केली आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या