28.2 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रशिंदे गटाला भाजपमध्ये विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही

शिंदे गटाला भाजपमध्ये विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही

एकमत ऑनलाईन

मुंबई : बंडखोर शिंदे गटाला भाजपमध्ये विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही, असा दावा आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. शिंदे-फडणवीसांच्या दिल्ली दौ-यावरून मिटकरी यांनी याबाबत ट्विट केले आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा रद्द झाला होता.

मिटकरी ट्विटमध्ये म्हणतात, शिंदे गटाला भाजपमध्ये विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही, असे चित्र सध्याच्या घडामोडींवरून निर्माण झाले आहे. राज्यपालांच्या भेटीनंतर फडणवीसांचा दिल्ली दौरा अचानक रद्द होणे आणि एकनाथ शिंदेंचे एकटेच दिल्लीला जाणे यावरून महाराष्ट्रात लवकरच महाभारत होणार असल्याची चिन्हे आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गुरुवारी दिल्ली दौरा नियोजित होता. याआधी एकनाथ शिंदे ५ वेळा दिल्लीला जाऊन आले आहेत. आजचा त्यांचा सहावा दिल्ली दौरा होता. आता शिंदे उद्या दिल्लीला जाऊ शकतात असे सांगण्यात आले आहे. मुंबईतील पूर्वनियोजित बैठकांमुळे हा दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या