25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रराज्याला सध्या दोन मुख्यमंत्र्यांची गरज

राज्याला सध्या दोन मुख्यमंत्र्यांची गरज

एकमत ऑनलाईन

मुंबई : ‘सध्या राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे. एक मुख्यमंत्री जे मंत्रालयात बसून काम करू शकेल आणि दुसरे मुख्यमंत्री जे वेगवेगळ्यापद्धतीने फोटोसेशन आणि गणपती दर्शन करत बसतील’ असे म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला. पत्रकारांशी बोलत असताना सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकार आणि निर्मला सीतारमण यांच्या बारामती दौ-यावर परखड भाष्य केले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या,मी स्वत: अनेक मंत्र्यांना माझ्या लोकसभा मतदारसंघातल्या कामांसाठी वेळ मागितली पण ते वेळ देत नाही. याचा अर्थ प्रशासन गेल्या अडीच महिन्यापासून ठप्प आहे.हे सरकार ज्या पद्धतीने सांगितले जाते ओरबडून आणि चुकीच्या पद्धतीने आलेला आहे आणि त्याचा परिणाम प्रशासनावर होताना दिसत आहे. प्रशासनाबरोबर काम करणा-या मंत्र्यांची राज्याला गरज आहे असं मला वाटते, अशी टीकाही सुळेंनी केली.

शिक्षकांचा मुद्दा अत्यंत गंभीर आहे. त्यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्र्यांनी बोलावे. त्याशिवाय काही होणार नाही. कारण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मुद्दा हा महत्त्वाचा आहे आणि अशा पद्धतीने कोणी प्रशासनाच्या पातळीवर निर्णय घेत असेल तर शिक्षण मंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालवायला हवे, असा सल्लाही सुळे यांनी सरकारला दिला.

मला आताची माहिती मिळते अजून पालकमंत्री नाही. अजितदादा ज्यावेळेस पालकमंत्री होते त्यावेळेस पुण्यामध्ये ते सकाळपासून काम करायचे. पण आता पालकमंत्री नाहीये त्यामुळे कशा पद्धतीने कामकाज ठप्प आहे. जिल्हा पातळीवरती अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यावरती तोडगा कोण काढणार हा प्रश्न आहे आणि त्यामुळे तात्काळ पालकमंत्री नियुक्त करण्याची गरज आहे, अशी मागणीही सुळेंनी केली.

‘आरोग्य मंत्री म्हणून राजेश टोपेंनी जे काम केलं ते आपण बघितलं. अख्या देशाने ते काम बघितलेलं आहे. पण आताचे आरोग्य मंत्री फक्त वादातच असल्याचा आपल्याला पाहायला मिळतात. त्यांची फक्त वादाच्याच बातम्या बाहेर येतात, असे म्हणत सुळे यांनी तानाजी सावंत यांना टोला लगावला.

‘बारामतीच्या संदर्भात म्हटले तर मी संविधान वरती विश्वास ठेवते. त्यावेळेस मला जेपी नड्डा यांचे वाक्य आठवते की, या देशांमध्ये एकच पार्टी राहिली पाहिजे पण मी संविधानाप्रमाणे अनेक पार्टी राहावी या मताची आहे. बारामतीमध्ये कोणीही यावे त्यांचे स्वागत आहे आणि अशा पद्धतीने बारामती जरी असली तरी सुद्धा लोकांचा कौल आहे तो कोणाला निर्णय द्यायचा. कुठलाही भाजपचा नेता बारामतीमध्ये येत असेल तर त्याचे स्वागतच आहे. त्याला विरोध करण्याचे कारण नाही. लोकशाहीमध्ये सर्वांना पक्ष वाढवायचा अधिकार आहे आणि प्रत्येक मतदारसंघात जाण्याचा अधिकार आहे आणि त्याला आपली हरकत असण्याचे कारण नाही, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सेंट्रल विस्टा असेल किंवा इतर वेगवेगळ्या मार्गांना नवीन नाव द्यायचा मुद्दा असेल. माझ्यासमोर सध्या बेरोजगारी, महागाई हे जनतेच्या संबंधित प्रश्न महत्त्वाचे मुद्दे आहेत. केंद्र सरकारने त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. इतर प्रकल्प राबवण्यापेक्षा महागाई आणि बेरोजगारी कशी कमी करता येइल यावर चर्चा होणं अपेक्षित आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या