मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील बंडखोरी केल्यानंतर अखेर उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला आहे. ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं त्यानंतर आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून आज संध्याकाळी सात वाजत शपथ घेणार आहेत.
आज सकाळीच एकनाथ शिंदे हे गोव्यावरुन मुंबईकडे रवाना झाले. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर उतरल्यानंतर ते फडणवीसांच्या भेटीला रवाना झाले. विमानतळावर उतरात आज शिंदेना झेड सुरक्षा देण्यात आली आहे.
आज संध्याकाळच्या सुमारास राजभवनावर जाऊन देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे सरकार बनवण्याचा दावा करतील. दरम्यान या पार्श्वभूमीवर राजभवन परिसरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या गटात जल्लोष सुरु झाला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे. मुंबई भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर म्हटले आहे, की यह तो झांकी है…मुंबई महापालिका अभी बाकी है!