24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयतिस-या लाटेचा लहान मुलांना धोका नाही

तिस-या लाटेचा लहान मुलांना धोका नाही

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनाच्या तिस-या लाटेचा धोका लहान मुलांमध्ये कमी असण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि एम्सने नुकतीच वर्तविली असल्याने देशभर दिलासादायक स्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या दोन लाटा परतवून लावल्यानंतर आता देशभरात तिस-या लाटेची चर्चा सुरु झाली आहे. या तिस-या लाटेचा सर्वाधिक धोका हा लहान मुले व तरुणांना बसणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे या लाटेचा लहान मुलांना नेमका किती आणि कशा पद्धतीने फटका बसेल यावर सध्या अभ्यास केला जात आहे. त्यातच संशोधक आणि विशेषज्ञ दररोज वेगवेगळे दावे करत आहेत.

याच दरम्यान, जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि एम्सचे एक नवीन सर्व्हेक्षण समोर आले आहे. त्यानुसार, कोरोनाच्या तिस-या लाटेचा धोका लहान मुलांमध्ये कमी असण्याची शक्यता आहे. लहान मुलांमध्ये सार्स कोवि-२ सीरो पॉझिटिव्हिटीचा दर वयस्क व्यक्तींच्या तुलनेत जास्त आहे. म्हणूनच, तिस-या लाटेमध्ये लहान मुलांना हा विषाणू त्रासदायक ठरण्याचा धोकाही कमी असल्याचे म्हटले जात आहे. सध्या देशात याविषयी अभ्यास सुरु असून अंतिम टप्प्यात हा महत्त्वाचा दावा करण्यात आला आहे.

सीरो पॉझिटिव्हिटी हा रक्तातील एक प्रकारचा अँटीबॉडीचा प्रकार आहे. गेल्या काही दिवसांपासून तिस-या लाटेचा मुलांना व तरुणांना अधिक धोका असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, या रिपोर्टमुळे पुन्हा नव्या चर्चेचा उधाण आले आहे. तयार करण्यात आलेला रिपोर्ट बहुकेंद्रित, लोकसंख्या, वयोगट यांच्यावर आधारित होता. विशेष म्हणजे ५ राज्यातील १० हजार प्रस्तावित लोकसंख्येच्या आधारावर तो करण्यात आला आहे.

पाच राज्यातून घेतला अहवाल
हा रिपोर्ट १५ मार्च ते १५ जून या कालावधीत तयार करण्यात आला असून, या रिपोर्टसाठी ४ हजार ५०९ जणांनी सहभाग नोंदवला होता, त्यापैकी ७०० जण हे १८ वर्षांखालील वयोगटातील होते आणि ३ हजार ८०९ हे १८ वर्षे पूर्ण झालेले होते. सहभागी झालेल्या व्यक्ती दिल्ली (शहरी भाग), दिल्ली (ग्रामीण, दिल्ली-एनसीआरमधील फरीदाबाद जिल्ह्यातील गावे), भुवनेश्वर, गोरखपूर, अगरताळा या पाच राज्यातील होत्या.

मुलांमध्ये सीरो पॉझिटिव्हिटी ५५़७ टक्क्यांवर
१८ वर्षांखाली मुलांमध्ये ५५.७ सीरो पॉझिटिव्हिटी आहे. तर, १८ पेक्षा जास्त वयोगटातील मुलांमध्ये याचे प्रमाण ६३.५ टक्के आहे. त्यामुळे वयस्क व्यक्ती व लहान मुले यांच्यातील सीरो पॉझिटिव्हिटीची संख्या तुलनेने फारशी वेगळी नाही. दिल्ली शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील मुलांमध्ये सीरो पॉझिटिव्हिटीचे प्रमाण कमी आढळून आले.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या