शिवणी : वादळी अवकाळी पावसात तुटून पडलेल्या विद्युत तारेला स्पर्श होऊन दोन म्हशीसह एक गाय दगावली. ही घटना किनवट तालुक्यातील मौजे दयाल धानोरा तांडा येथे रविवारी सकाळी घडली.
शिवणी परिसरात शनिवारी रात्री जोरदार वादळासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे काही ठिकाणी महावितरणच्या विद्युत तारा तुटून पडल्या होत्या.
नेहमीप्रमाणे तांड्यातील गायी, म्हशीचा कळप रविवारी चरण्यासाठी सोडण्यात आला. त्यावेळी गावालगत असलेल्या नाल्याजवळच्या विद्युत खांबावरून तुटून पडलेल्या तारेला स्पर्श होऊन दोन दुधाळ म्हशी व एका गाईला शॉक लागला. यात तीनही जनावरांचा जागीच हेरपळून मृत्यू झाला. याबाबत पशुपालकांनी विद्युत महावितरण कंपनीकडे नुकसान भरपाई मिळावी यासाठी लेखी अर्ज केला आहे.