16.6 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeराष्ट्रीयट्रेन गार्डला आता 'ट्रेन मॅनेजर' संबोधले जाणार

ट्रेन गार्डला आता ‘ट्रेन मॅनेजर’ संबोधले जाणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या ट्रेन गार्डना आता ट्रेन मॅनेजर असे संबोधले जाणार असून, त्यांचे काम आणि वेतनश्रेणी पूर्वीप्रमाणेच राहणार आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयातर्फे आदेश काढण्यात आले आहेत. गार्डला ट्रेन मॅनेजर असे नवीन नाव देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, असिस्टंट गार्डला ‘सहायक पॅसेंजर ट्रेन मॅनेजर आणि सीनियर पॅसेंजर गार्डला वरिष्ठ पॅसेंजर ट्रेन मॅनेजर असे नाव देण्यात आले आहे.

यासंबंधीचे पत्र रेल्वे बोर्डाने रेल्वेच्या सर्व झोनच्या महाव्यवस्थापकांना पाठवले असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. हा आदेश रेल्वेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरही शेअर करण्यात आला आहे. २००४ पासून रेल्वे कर्मचारी गार्डचे नाव बदलण्याची मागणी करत होते. अखेर ही मागणी पूर्ण करण्यात आली आहे. रेल्वेच्या आदेशानुसार आता सीनियर पॅसेंजर गार्ड-सीनियर पॅसेंजर ट्रेन मॅनेजर. असिस्टंट गार्डला असिस्टंट पॅसेंजर ट्रेन मॅनेजर, तर गुड्स गार्डला गुड्स ट्रेन मॅनेजर, सीनियर गुड्स गार्डला सीनियर गुड्स ट्रेन मॅनेजर आणि मेल/एक्सप्रेस गार्डला आता मेल/एक्स्प्रेस ट्रेन मॅनेजर या नावाने संबोधले जाणार आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या