25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रगद्दारांना क्षमा नाही ऐकले होते ठाण्यात

गद्दारांना क्षमा नाही ऐकले होते ठाण्यात

एकमत ऑनलाईन

मुंबई : अनेक आमदार बंडखोर नेते एकनाथ शिंदेंच्या गोटात सामिल झाल्यानंतर एकाकी पडलेल्या उद्धव ठाकरेंनी काल मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवास्थान वर्षा बंगला सोडला आहे. त्यापूर्वी त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी मी मुख्यमंत्री नको असेल तर मला समोर येऊन सांगा मी य क्षणाला पद सोडायला तयार असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले.

या सर्व घडोमोडींमध्ये विविध पक्षांच्या नेत्यांकडून शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना दिसून येत असून, आता यामध्ये मनसेनेदेखील उडी घेतली आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी ट्वीट करत शिवसेनेवर खोचक टिका केली आहे.

राजू पाटील यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, अशी कशी फुटून गेली वाघाची छाती, कारण द्यायचे ‘हिंदुत्व’, खरंतर ‘ईडी’काडीची भीती. ‘गद्दारांना क्षमा नाही’ ऐकले होते. ठाण्यात, ४६ जणांचा कोरस गातोय सत्तेसाठीच्या गाण्यात असे यमक जुळवत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. तर त्या पूर्वी केलेल्या ट्वीटमध्ये राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनामा विधानाचीदेखील खिल्ली उडवली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या